पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आघाडीवर भरवसा ठेवू नका, मायावतींचे पुन्हा एकला चलो रे...

मायावती

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी केलेल्या युतीनंतर पहिल्यांदाच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आघाडीवर भरवसा ठेवू नका, असे सूचक वक्तव्य केले आहे. सपाशी आघाडी करूनही त्याचा विशेष फायदा या दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीत झाला नाही. त्यामुळे मायावती यांचे हे विधान महत्त्वाचे ठरले आहे. पुढील काळात त्या पुन्हा स्वतंत्रपणेच निवडणूक लढवतील, असे दिसू लागले आहे.

VIDEO: भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथेने मारहाण

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, आमदारांची आणि नवनिर्वाचित खासदारांची बैठक सोमवारी मायावती यांनी घेतली. यावेळी त्यांनी स्वबळावर पुढील विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करण्याची सूचना सर्वांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी आमदारांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्याने आता येथे पुन्हा विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. 

बहुजन समाज पक्ष शक्यतो पोटनिवडणूक लढवत नाही. त्यामुळे मायावती यांनी सोमवारी केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. ११ पैकी ९ ठिकाणी भाजपचे आमदारच लोकसभेत गेले आहेत. तर प्रत्येकी एके ठिकाणी समाजवादी पक्ष आणि बसपाचे आमदार खासदार झाले आहेत. 

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील : पंकजा मुंडे

बसपाच्या पारंपरिक मतपेढीमुळेच राज्यात १० ठिकाणी आपले उमेदवार यशस्वी ठरले आहेत. समाजवादी पक्षाला मानणाऱ्या मतदारांची मते आपल्याकडे हस्तांतरित झाली नाहीत, हे सुद्धा त्यांनी या बैठकीत सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.