पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्हाला आव्हान देऊ नका, ममतांचा भाजपला इशारा

ममता बॅनर्जी

ईदनिमित्त जमलेल्या मोठ्या जनसमुदायासमोर केलेल्या भाषणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केल्याची किंमत भाजपला मोजावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आम्हाला आव्हान देऊ नका, असेही त्यांनी सुनावले आहे.

 

शालिमार एक्स्प्रेसः जिलेटिन कांड्यांसोबत भाजप सरकारविरोधात पत्र

गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचेही दिसले होते. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा सूर्य डोक्यावर येतो त्यावेळी तो खूप तापलेला असतो. पण त्यानंतर काही वेळातच त्याची दाहकता कमी होते. ज्या पद्धतीने त्यांनी ईव्हीएममध्ये फेरफार करून यश मिळवले आहे. त्याप्रमाणे भविष्यात त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. त्यांचाही अस्त लवकरच होईल.

जय श्रीराम म्हणण्यावरूनही ममता बॅनर्जी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यावरून ममता बॅनर्जी यांनी काही जणांना फटकारले होते. भाजप धर्माचे राजकारण करू पाहात असल्याची टीका त्यांनी केली होती. जय श्रीराम घोषणेला आमचा विरोध नाही. पण धार्मिक कार्यक्रमात अशी घोषणा द्यायला हरकत नाही. राजकीय कार्यक्रमात जय श्रीरामचा नारा देणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले होते.

मोदींची प्रशंसा करणे काँग्रेस नेत्याला पडले महागात

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवले. राज्यातील लोकसभेच्या ४२ पैकी १८ जागांवर भाजपचे उमेदवार यशस्वी ठरले होते. तर २२ जागांवरच तृणमूल काँग्रेसला यश मिळाले होते.