सुधारित नागरिकत्व कायद्यानंतर देशातील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील सर्व खासगी वृत्तवाहिन्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. वृत्तवाहिन्यांनी राष्ट्रविरोधी कृत्यांची दृश्ये आपल्या वाहिनीवर दाखवू नयेत. त्याचबरोबर समाजात तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही दृश्ये किंवा बातम्या प्रसारित करू नये, असे या सूचनेत म्हटले आहे. दिल्लीच्या एका भागात गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही सूचना महत्त्वाची मानली जात आहे.
७२ कोटींचा बँक घोटाळा; राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक
दिल्लीच्या ईशान्य भागात उसळलेल्या दंगलीमध्ये आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७ झाली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आणि समर्थनात रस्त्यावर उतरलेल्या दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसारित केलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, समाजात तेढ निर्माण होईल किंवा हिंसाचारासाठी प्रोत्साहन मिळेल, असे कोणतेही वृत्त किंवा दृश्य प्रसारित करणे टाळावे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळेल, असे कोणतेही राष्ट्रविरोधी कृत्य प्रसारित केले जाऊ नये.
दिल्ली : हिंसा करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
एखाद्या धर्माच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांची दृश्ये दाखवणेही टाळावे, असे या सूचनेत म्हटले आहे. चुकीची माहिती दाखवणारे, बदनाम करणारे, अर्धसत्य किंवा एकच बाजू दाखवणारे वृत्तही प्रसारित केले जाऊ नये, असेही या सूचनेत म्हटले आहे.