पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

७० लाख नाही तर फक्त १ लाख लोकच करणार डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोदी सरकारने जय्यत तयारी केली आहे. भारत दौऱ्या दरम्यान सुरुवातीलाच ट्रम्प अहमदाबाद येथे जाणार आहेत. त्याठिकाणी २२ किलोमीटरपर्यंत त्यांचा रोड शो निघणार आहे. या रोडशोमध्ये फक्त १ लाखांपर्यंत लोकं सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अहमदाबाद महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे.

दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेश दौऱ्यावर

अहमदाबाद महानगरपालिका आयुक्त विजय नेहरा यांनी बुधवारी सांगितले की, 'डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोडशोमध्ये फक्त १ लाख लोकं सहभागी होण्याची अपेक्षा आहे.' काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करत हिच माहिती दिली होती. या त्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले होते की,' माझा अहमदाबाद म्हणतो की # नमस्तेट्रम्प # इंडियारोडशो. या रोड शोमध्ये सामील होण्यासाठी एक लाखांहून अधिक लोकं आधीच तयार आहेत. अहमदाबादला भारतीय संस्कृती जगासमोर दाखविण्याची ही मोठी संधी आहे.'

दिल्ली निवडणुकीत भाजपने तयार केले डीपफेक व्हिडिओ

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी करत त्यांच्या स्वागतासाठी ७० लाख भारतीय उभे राहणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी सांगितलेला आकडाच अहमदाबाच्या एकूण लोकसंख्ये एवढा आहे. दरम्यान, रोड शोवेळी ट्रम्प आणि मोदी सुरुवातीला अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात जाणार आहेत. त्यानंतर दोघेही मोतेरा येथे उभारण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडिअमवर जाणार आहेत. 

देवेंद्र फडणवीसांना नागपूर कोर्टाकडून जामीन मंजूर