पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प लेकीसह भारत दौऱ्यावर येणार

ट्रम्प यांच्यासोबत लेकही भारत दौऱ्यावर येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात आणखी एक वृत्त समोर येत आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह त्यांची मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जॅरेड कसनर देखील भारतात दौऱ्यावर येणार आहेत.

'पाक जिंदाबाद म्हणणाऱ्या तरुणीचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन'

डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह एक उच्चस्तरिय प्रतिनिधीमंडळही असेल. अमेरिकेतील व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायथिझर, एनएसए रॉबर्ट ओ ब्रायन, सचिव स्टीव्ह मनूचीन, कॉमर्स सचिव विलबर रॉस आणि व्यवस्थापन आणि अर्थ कार्यालयाचे संचालक मायक मुलवाने ही मंडळी ट्रम्प यांच्यासोबत असतील. 

वारिस पठाणांविरोधात पक्षाची कारवाई, माध्यमांशी बोलण्यास

ट्रम्प यांच्या स्वागताची अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये 'नमस्ते मोदी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ट्रम्प एका व्यासपीठावर दिसतील. अहमदाबादमधील कार्यक्रमाशिवाय ट्रम्प आगरा येथील ताजमहाला देखील भेट देणार आहेत. दिल्लीत भारत-अमेरिका यांच्यातील काही महत्त्वपूर्ण करारही अपेक्षित आहेत.