पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहल भेटीनंतर ट्रम्प म्हणाले...

ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत.

दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रा येथील प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहल या ऐतिहासिक वास्तूला भेट देली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम पहिला मेलानिया ट्रम्प यांच्यासह मुलगी इंवाका ट्रम्प या देखील आपल्या पतीसह उपस्थित होत्या. पत्नी मेलानियाच्या हातात हात घेऊन ताजमहलच दर्शन केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिजिटर बूकमध्ये एक खास संदेश लिहिला आहे.

डायना बेंचजवळ उभे राहून ट्रम्प दाम्पत्याचे फोटोसेशन

ताजमहल भारताची समृद्धी आणि विविधतेचं दर्शन देणारी प्रेरणादायी वास्तू आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील भावना शब्दांत उतरवल्या. थँक्यू इंडिया! असा उल्लेखही त्यांनी व्हिजिटर बूकमध्ये केलाय. सोमवारी अहमदाबादमधून ट्रम्प यांनी आपल्या भारत दौऱ्याला सुरुवात केली. अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिंगन देत ट्रम्प यांचे स्वागत केले. विमानतळावरुन भव्य रोड शो करत दोन्ही नेत्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिती महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सूताची माळ घातली. राष्ट्राध्यक्षांसह त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनी चरखा चालवल्याचेही पाहायला मिळाले.  

दहशतवादी कारवाया थांबवा; ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

साबरमती येथे येणारा परदेशी नेता याठिकाणच्या व्हिजिटर बूक मध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी काही तरी मनातील भावना व्यक्त करत असतो. मात्र ट्रम्प यांनी याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद म्हटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ट्रम्प यांना ट्रोलही करण्यात आले. यापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनीही साबरमतीला आश्रमाला भेट दिल्यानंतर महात्मा गांधी यांच्याविषयी कोणतीही भाव व्यक्त न केल्याचे पाहायला मिळाले होते. आबे यांनी व्हिजिटर बूकमध्ये लव्ह अँण्ड थँक्यू एवढाच उल्लेख केला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Donald Trump Tour Of India Agra visit Trump too see Taj Mahal with family ahmedabad sabarmati ashram with narendra modi