पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदींसाठी आयोजित खास कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्पही येणार!

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

पुढल्या रविवारी ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या Howdy, Modi! या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार आहेत. व्हाईट हाईसकडून रविवारी याबद्दलची माहिती देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांची या कार्यक्रमातील उपस्थिती ही भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांना आणखी पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संबंधही आणखी चांगले होणार आहेत.

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: उध्दव ठाकरे

ट्रम्प या कार्यक्रमात फक्त सहभागी होणार नाहीत तर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी ते संवादही साधणार आहेत, असे या कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनासाठी नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत. यावेळी भारत आणि अमेरिकेचे दोन्ही नेते कोणतीही द्विपक्षीय चर्चा करणार नाहीत. त्याचबरोबर शिष्टमंडळ पातळीवरही कोणतीही चर्चा होणार नाही. 

काही दिवसांपूर्वीच काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याची आपली तयारी असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. एकूण तीन वेळा त्यांनी या पद्धतीची विधाने केली होती. पण प्रत्येकवेळी भारताने काश्मिरचा प्रश्न द्विपक्षीय असून इतर कोणत्याही देशाने त्यात लक्ष घालू नये, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे. 

'छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, आदेश द्यायचे असतात'

ह्युस्टनमधील कार्यक्रमानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प हे पुढच्या कार्यक्रमासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. त्याच दिवशी ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचीही भेट घेणार आहेत, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Donald Trump to attend Howdy Modi in Houston to address over 50000 Indian Americans White House