पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराकवर भडकले डोनाल्ड ट्रम्प, इराणलाही दिली धमकी

डोनाल्ड ट्रम्प

इराणी जनरल कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर आता विदेशी लष्कराला परत पाठवण्याच्या इराकी संसदेच्या निर्णयावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले आहेत. इराकने जर अमेरिकन लष्कराला परत पाठवण्यास भाग पाडले तर त्यांच्याविरोधात कठोर प्रतिबंध लावू, असा सज्जड दमच त्यांनी इराकला दिला आहे. इराकला अशा प्रतिबंधाला सामोरे जावे लागेल, ज्याचा सामनाच त्यांनी कधी केला नसेल, असेही ते म्हणाले. इराणला इशारा देताना त्यांनी म्हटले की, जर कोणत्या इस्लामिक देशाने हल्ला केला तर आम्ही जोरदार पलटवार करु.

ट्रम्प पुढे म्हणाले की, आमचा इराकमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि मौल्यवान हवाई तळ आहे. तो उभा करण्यासाठी आम्ही अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत. जोपर्यंत आम्हाला तो हवाईतळ उभा करण्यासाठी आलेला खर्च दिला जात नाही. तोपर्यंत आम्ही त्याचा ताबा सोडणार नाही. जर त्यांनी आम्हाला तो हवाईतळ सोडण्यास बळजबरी केली तर त्यांच्याविरोधात असे प्रतिबंध लादण्यात येतील ज्याचा त्यांनी कधीच सामना केला नाही. 

टाटा समूहामध्ये कोणतीही भूमिका बजावण्यात रस नाही : सायरस मिस्त्री

तत्पूर्वी, इराकच्या संसदेने विदेशी सैन्यांना परत पाठवण्याचे विधेयक संसदेत संमत केला होता. त्याचबरोबर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय आघाडीतून बाहेर पडावे लागेल, असेही इराकी संसदेने म्हटले होते. दुसरीकडे, बगदादमध्ये अमेरिकन दुतावासाजवळ सलग दुसऱ्या दिवशी रॉकेट हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली. अमेरिकन ठिकाणांवर केलेल्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का? अमित शहा