पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींशी बोलल्यानंतर ट्रम्प म्हणाले, काश्मीरमध्ये स्थिती कठीण, पण चर्चा चांगली झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (AP Photo)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करुन पाकिस्तानचे काही नेते भारतविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी टि्वट केले आहे. माझे दोन चांगले मित्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा झाली, असे टि्वट त्यांनी केले. 

दोन्ही देशातील पंतप्रधानांबरोबर व्यापार, रणनीतीक भागीदारीबाबत आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तानदरम्यान काश्मीरमध्ये तणाव कमी करण्याच्या दिशेबाबत चर्चा झाली. एक कठीण स्थिती, पण चांगली चर्चा, असेही त्यांना आपल्या टि्वटमध्ये म्हटले. 

काश्मीरच्या मुद्यावर मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापतीचा पार्श्वभूमीवर यावेळी पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. एएनआयच्या वृत्तानुसार, या दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरुन द्विपक्षीय चर्चा केली. सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना रोखणे गरजेचे आहे, असे मोदींनी यावेळी म्हटले आहे. पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे शांततेला धोका निर्माण झाला आहे. भारत त्यांच्याकडून होणाऱ्या कुरापती सहन करणार नाही, असेही मोदींनी स्पष्ट केले. याशिवाय भारत-अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबत लवकरच पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी ट्रम्प यांना दिले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Donald Trump says Spoke to my two good friends Prime Minister Modi and Prime Minister Khan A tough situation in Kashmir but good conversations