पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चायवाला'...खूप कडक आहे, ट्रम्प यांची 'मन की बात'

मोदी आणि ट्रम्प

'मोदी माझे खरे मित्र आहेत. ते भारताचे यशस्वी पंतप्रधान आहेत. देशाच्या विकसासाठी ते झटत आहेत. मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती होत आहे, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी मोदींसह भारताचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर देखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.  

'नमस्ते ट्रम्प': भारत-अमेरिकेच्या नात्याचे नवे युग सुरु- PM मोदी

ट्रम्प यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकत होते. त्यांनी हे सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम करुन काहीही साध्य करता येते. भारत खूप चांगले काम करत आहे. आम्हाला भारताचा अभिमान आहे. तसंच, ' मोदींच्या काळात प्रत्येक गावात वीज पोहचली. प्रत्येक गावं इंटरनेटशी जोडली गेली. जनतेला मोदींविषयी खूप प्रेम आहे. मोदींच्या नेतृत्वात भारताची अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसंच त्यांनी भारतामध्ये भव्य स्वागत केल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. 

शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक