पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : मोदी-ट्रम्प यांच्या भेटीतील 'दे टाळी' क्षण

फ्रान्समधील जी ७ परिषदेमध्ये मोदी-ट्रम्प यांच्या खास चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ७ परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मोदींनी काश्मीर मुद्यावर रोखठोक मत मांडल्यांनतर ट्रम्प यांनी मोदींना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.आंतरराष्ट्रीय राजकारणातीलदोन प्रमुख आणि लोकप्रिय नेत्यांमधील चर्चे दरम्यान एक अनोखा क्षणही पाहायला मिळाला.

 ट्रम्पसमोर मोदी म्हणाले, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, आमचं आम्ही बघू!

प्रसारमाध्यमांनी इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांची मोदींनी हिंदीमध्येच उत्तरे दिली. यादरम्यान मोदी म्हणाले की,  आम्हाला दोघांना बोलू द्या, आमच्यात चर्चा सुरु राहिल.योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहचवू. हिंदी भाषेला प्राधान्य देणाऱ्या मोदींच्या या विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. पण ते बोलत नाहीत, असे भाष्य केले. त्यानंतर मोदींनी ट्रम्प यांना टाळी देत त्यांच्या हातात हात घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही नेते खळखळून हसताना दिसले.

मोदी-ट्रम्प भेटीची इम्रान खान यांना धास्ती   

दोन्ही नेत्यांनी या भेटीत काश्मीरच्या मुद्यावर चर्चा झाली. काश्मीर हा भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे. आम्ही चर्चेतून यावर तोडगा काढू असे मोदींनी यावेळी सांगितले. मोदींच्या या वक्तव्याला ट्रम्प यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दोन्ही देश शांततेच्या मार्गाने काश्मीरचा मुद्दा सोडवतील, असा विश्वास देखील ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:donald trump says pm modi actually speaks very good English he just doesn t want to talk watch video