पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवादी कारवाया थांबवा; ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवरुन होणाऱ्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी  अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये केलेल्या भाषणा दरम्यान पाकिस्तानला इशारा दिला.

CAA: जाफराबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, कॉन्स्टेबलचा मृत्यू

पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्यासाठी माझे सरकार प्रयत्न करत आहे. तसंच दहशतवादाला आळा घालण्यासाठी अमेरिका-भारत एकत्र काम करु, असे देखील ट्रम्प यांनी सांगितले. 'कट्टर इस्लामिक दहशतावद्यांपासून आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका आम्ही दोघंही एकत्र येऊन काम करू, असे ट्रम्प यांनी सांगितले.   

शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक

दहशतवादासंदर्भात बोलताना ट्रम्प यांनी पुढे असे सांगितले की, पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे आम्ही नष्ट करत आहोत. आम्ही आयसीसचा १०१ टक्के खात्मा केला आहे. आयसीसच्या म्होरक्याचा खात्मा आम्ही केला. तसंच बगदादीला ठार करण्यात आम्हाला यश आले, असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. 

'चायवाला'...खूप कडक आहे, ट्रम्प यांची 'मन की बात'