पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताने दिलेले प्रेम मी कधीच विसरणार नाही: ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

'भारताबद्दल मला विशेष अभिमान आहे. प्रेमाचा संदेश घेऊन मी भारतामध्ये आलो आहे. भारताविषयी माझ्या मनात विशेष प्रेम आणि आदर आहे. भारतीय जनतेने प्रेम दाखवल्याबद्दल त्यांचे आभार. तुम्ही दिलेले प्रेम मी कधीच विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक

ट्रम्प यांनी सांगितले की, 'भारत-अमेरिकेची चांगली मैत्री आहे. अमेरिकेच्या हृदयात भारताबद्दल अढळ स्थान आहे. भारत आणि अमेरिकेमधील विश्वास आता आणखी मजबूत झाला आहे. तसंच, भारत आणि अमेरिकेची मैत्री यापूर्वी एवढी मजबूत कधीच नव्हती. जेवढी आत्ता आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी यांनी भारतीय संस्कृतीचे देखील कौतुक केले आहे. भारत असा देश आहे जिथे सर्व सण साजरे केले जातात. यामध्ये होळी आणि दिवाळी या दोन सणांचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. 

 

'नमस्ते ट्रम्प': भारत-अमेरिकेच्या नात्याचे नवे युग सुरु- PM मोदी

दरम्यान, 'भारताने जगाला मानवतेचा धडा दिला आहे. भारतामध्ये सगळ्याच जाती-धर्माची लोकं एकत्र राहतात. भारतामध्ये सर्वांचा सन्मान केला जातो, असे ट्रम्प यांनी सांगितले. मोटेरा स्टेडियम जगातील सर्वात मोठं आणि सुंदर स्टेडियम आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' यांनी मी प्रभावित झालो असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.   

'चायवाला'...खूप कडक आहे, ट्रम्प यांची 'मन की बात'