पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन्ही देशांची तयारी असेल तर काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसाठी तयार - ट्रम्प

इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प भेट

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अद्यापही तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेमध्ये आले आहेत. त्यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे सांगितले.

'अधिकाऱ्यांनी काहीच चूक केली नाही तर चिदंबरम कसे जबाबदार'

ट्रम्प आणि इमरान खान यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या भेटी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, 'फक्त पाकिस्तान आणि इम्रान खानला वाटते म्हणून काहीही होऊ शकत नाही. दोन्ही देशांची तयारी असेल तर मी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करायला तयार आहे.' तसंच काश्मीर प्रश्न गुंतागुंतीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे, असे देखील ट्रम्प यांनी सांगितले. 

चर्चेची वेळ संपली आता काम करण्याची गरजः मोदी

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमातील मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत मोदींचे भाषण अप्रतिम झाल्याचे म्हटले आहे. मोदी त्या कार्यक्रमात केलेले विधान आक्रमक होते. मोदी असे विधान करतील असे मला वाटले नव्हते. मात्र उपस्थिती ५० हजार लोकांनी त्यांच्या विधानाचं स्वागत केले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. 

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे