कोरोनाबाधितांना इंजेक्शनद्वारे ब्लीज देण्याच्या सल्ल्यानंतर झालेल्या वादानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट केले आहे. कोरोना विषाणूबाबत दररोज होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी वेळ काढणे आवश्यक नाही, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. आपल्या या टि्वटच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद बंद करण्याच्या बातम्यांना एकप्रकारे त्यांनी दुजोराच दिला आहे. सध्या माध्यमांत ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेची मोठी चर्चा सुरु असते. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी ट्रम्प हे पत्रकार परिषद घेतात. परंतु, या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना तिखट प्रश्न विचारले जातात. दररोज सायंकाळी विविध वृत्त वाहिन्यांवर ट्रम्प यांची पत्रकार परिषद चर्चेच्या केंद्रस्थानी असते.
कितीही डोके फोडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार: संजय राऊत
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेचा हेतू काय आहे, जेव्हा पारंपारिक मीडिया केवळ प्रतिकूल प्रश्न विचारतात आणि सत्य दाखवताना तथ्यांना योग्यप्रकारे समोर ठेवण्यास नकार देतात. त्यांना चांगली क्रमवारी मिळते आणि अमेरिकन जनतेला केवळ बनावट बातम्या मिळतात. हा वेळ आणि प्रयत्नांचा अपव्यय आहे.
कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर
ट्रम्प यांनी कोरोनाबाधितांवर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करण्यास किंवा घरात वापरले जाणारे ब्लीचचे इंजेक्शन देण्यास सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून यावर तिखट प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आपण हे विनोदाने म्हटल्याचे सांगितले.
कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर
दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. तेथे मृतांचा आकडा ५३,५११ पर्यंत पोहोचला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ९,२४,५७६ इतकी झाली आहे. यातील ९९,३४६ जण संक्रमणमुक्त झाले आहेत.