पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प यांची नमती भूमिका, औषधे निर्यातीवरील भारताच्या भूमिकेला पाठिंबा

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेला मलेरियारोधक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल औषधे दिली नाहीत तर प्रत्युत्तर दिले जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. पण मंगळवारी त्यांनी नमती भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औषधे निर्यातीसंदर्भातील धोरणाला पाठिंबा दिला. त्याचवेळी भारत ज्या पद्धतीने कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी काम करतो आहे, त्याचे कौतुकही केले. 

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत २००० नागरिकांचा मृत्यू

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला सहमती व्यक्त केली. ते म्हणाले, मलेरियारोधक औषधांचे लाखो डोस मी अमेरिकेत आणले आहे. दोन कोटी ९० लाख डोस आतापर्यंत आले आहेत. मी नरेंद्र मोदींशीही या संदर्भात बोललो आणि त्यांना ही औषधे निर्यात करू शकता का विचारले. ते अतिशय चांगले आहेत. त्यांनी भारतीयांसाठी या औषधांची निर्यात रोखून धरली होती. पण आता त्यांच्याकडून काही चांगले निर्णय आले आहेत. खूप अधिकारी या संदर्भात काम करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात मला कोणतीही वाईट माहिती ऐकावी लागणार नाही.

कोरोनाच्या लढ्यात मोठा दिलासा; लॉकडाऊनमुळे संसर्ग झाला कमी

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल या दोन्ही औषधांच्या निर्यातीवरील बंदी भारताने अंशतः मागे घेतली आहे. भारतीय गरजेचा विचार करून ज्या देशांनी आधीच या औषधांची मागणी केली होती. त्यांना ती देण्याचा विचार केला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आधीच्या विधानात बदल केला आहे.