पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प बाहुबली होतात...पाहा व्हिडिओ

डोनाल्ड ट्रम्प

बाहुबली हा सर्वांधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात येत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की, ट्रम्प आणि बाहुबली, दोघांची एकाचवेळी चर्चा का होत आहे? झालं असं की, टि्वटरवर डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्रम्प यांना भारत दौऱ्यात बाहुबलीच्या रुपात दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर करत आनंदही व्यक्त केला आहे. 

@Silmemes1 या टि्वट हँडलने १ मिनिट २१ सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर्सच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेची मैत्री दाखवण्यात आली आहे. बाहुबली चित्रपटातील एक दृष्य एडिट केले असून यामध्ये ट्रम्प यांना बाहुबली दाखवण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प या त्यांच्याबरोबर रथावर बसल्याचे दाखवण्यात आले आहे. ट्रम्प आपली मुलगी इव्हांका आणि तिचा पती जेरेड हेही या क्लिपमध्ये दिसतात. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांनाही दाखवण्यात आले आहे. या मीम व्हिडिओत बाहुबलीचे लोकप्रिय गाणेदेखील आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक, आज भारतात आणणार ?

सर्वांत विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा व्हिडिओ रिटि्वट केला आहे. त्यात ते म्हणतात की, भारतातील माझ्या शानदार मित्रांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. 

सोशल मीडियावर ट्रम्प यांनी हा व्हिडिओ रिटि्वट केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी ट्रम्प यांनी हा व्हि़डिओ शेअर करणे चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. 

माफी मागितल्यानंतर वारिस पठाण म्हणाले, जय हिंद!

दरम्यान, दि. २४-२५ फेब्रुवारी रोजी ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड हेही असणार आहेत. ट्रम्प सर्वांत प्रथम अहमदाबाद येथे जातील. तिथे पंतप्रधान मोदींसह ते एका मोठ्या रोड शोमध्ये भाग घेतली. त्यानंतर ते अहमदाबाद येथे नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात सहभागी होतील. ट्रम्प यांच्या हस्ते मोटेरा क्रिकेट स्टेडिअमचे उद्घाटनही होईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:donald trump retweets morphed baahubali video says looking forward to being with great friends in india