पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प-किम जोंगची ग्रेट भेट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रथमच उ.कोरियात

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी उत्तर कोरियाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आले आहेत. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची भेट घेतली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा आतापर्यंतचा हा पहिलाच उत्तर कोरियाचा दौरा आहे. एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनी माध्यमांसमोर येत फोटो सेशन केले. किम आणि ट्रम्प यांच्यातील ही तिसरी भेट आहे. 

आयात करात भारताने केलेली वाढ अस्वीकारार्ह, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट

या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान ट्रम्प हे दक्षिण आणि उत्तर कोरियाला विभागणाऱ्या काँक्रिटच्या सीमेवर पोहोचले. तिथे किम हे त्यांचे स्वागत करण्यासाठी आले. दोघांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोघेही उत्तर कोरियाई क्षेत्राकडे गेले. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या जमिनीवर पाऊल ठेवताच किम यांनी टाळ्या वाजवल्या आणि पुन्हा एकदा दोघांनी हस्तांदोलन करत छायाचित्र काढून घेतले. 

त्यानंतर दोघेही पुन्हा दक्षिण कोरियाच्या बाजून गेले. तिथे पत्रकारांशी संवाद साधला. ट्रम्प म्हणाले की, जगासाठी हा एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे. येथे येणे माझ्यासाठी सम्मानाची गोष्ट आहे. खूप महान गोष्टी घडत आहेत.

धार्मिक स्वातंत्र्याबाबतचा अमेरिकेचा अहवाल भारताने फेटाळला

ट्रम्प यांनी शनिवारी अचानक या दौऱ्याची माहिती टि्वटरवर दिली होती. अणवस्त्र निरस्त्रीकरणाच्या दिशेने ही महत्वाची भेट आहे. यापूर्वी ट्रम्प आणि किम यांची दुसरी भेट ही हनोई येथे झाली होती. पण ही भेट निष्फळ ठरली होती. ट्रम्प आणि किम हे पहिल्यांदा सिंगापूर येथे भेटले होते.

नरेंद्र मोदी जगातील सर्वात ताकदवान नेते; ट्रम्प, पुतीनही मागे