अमेरिकेतील ह्यूस्टन शहरात 'हाभडी मोदी' कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमावेळी जवळपास ५० हजार अमेरिकेतील भारतीय नागरिकांना संबोधित करणार आहे. एवढेच नाही तर या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील अर्धा तास भाषण करणार असल्याचे वृत्त आहे.
VIDEO: मोदींनी जिंकलं मन, प्रोटोकॉल तोडून केलं 'हे' काम
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ह्यूस्टन येथील 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्प ३० मिनिटे अमेरिकेतील भारतीय नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. मोदींच्या संपूर्ण भाषण हाईपर्यंत ते या कार्यक्रमात उपस्थित राहतील, असेही बोलले जात आहे. शनिवारी व्हाइट हाऊसने जारी केलेल्या ट्रम्प यांच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार, ट्रम्प एनआरजी स्टेडियममध्ये जवळपास १०० मिनिटे वेळ देणार आहेत.
बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये उद्ध्वस्त झालेले दहशतवादी कॅम्प
'हाऊडी मोदी' कार्यक्रमानंतर मोदी न्यूयॉर्क दौरा करणार आहेत. याठिकाणी मोदी-ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक नियोजित आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रांतील प्रमुख नेते अनेक महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.