भारत आणि अमेरिका यांच्यात ३ अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला सुनावलेही. पाकिस्तानच्या भूमीवरुन सुरु असलेल्या दहशतवादाला लगाम लावण्याची गरज आहे. ट्रम्प आणि मोदींनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा उल्लेख केला. ट्रम्प यांनीही भारताचा हा दौरा अविस्मरणीय असल्याचे म्हटले.
सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच, गोंधळात विधेयक मंजूर
भारताने अमेरिकेबरोबर ३ अब्ज डॉलरचा करार केला आहे. यात अमेरिकेकडून २४ एमएच ६० रोमिओ हेलिकॉप्टर खरेदीचा २.६ अब्ज डॉलरचा करार आहे. अन्य एका व्यवहारात ६ एएच ६४ इ अपाचे हेलिकॉप्टर खरेदीचा सुमारे ८० कोटी डॉलरचा करार आहे. ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे दोन्ही देशात संरक्षण संबंध आणखी मजबूत होतील, असेही ते म्हणाले.
...तर कर्जमाफी द्यायला ४०० महिने लागतील: फडणवीस
पंतप्रधान मोदी यांनीही संयुक्त पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही भारत-अमेरिका भागीदारीच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा केली. यात संरक्षण आणि सुरक्षा या विषयांचा समावेश होता. आम्ही ऊर्जा रणनीती भागीदारी, व्यवसाय आणि जनता ते जनता यांच्यातील संबंधावर चर्चा केली. संरक्षण क्षेत्रात भारत-अमेरिका दरम्यान मजबूत नाते आमच्या भागीदारीचा महत्त्वपूर्ण पक्ष आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायमूर्तींना स्वाइन प्लूची लागण
ट्रम्प यांनी दहशतवादाचा उल्लेख करताना म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि मी आपल्या नागरिकांना कट्टर इस्लामी दहशतवादापासून वाचवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. अमेरिका पाकिस्तानच्या जमिनीवरुन दहशतवाद रोखण्यासाठी पाऊल उचलत आहेत.