अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये महाभियोग ठराव मंजूर झाला आहे. दोन वेगवेगळे ठराव या सभागृहात मांडण्यात आले होते. ते दोन्ही मंजूर झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. कनिष्ठ सभागृहात महाभियोग ठराव मंजूर झाल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न कोणाच्याही मनात उपस्थित होऊ शकतो.
NDA तून बाहेर पडलो असलो, तरी आम्ही UPA सोबत नाही - संजय राऊत
महाभियोग ठराव ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटविण्याच्या प्रक्रियेची सुरुवात असते. या आधारावरच त्यांच्याविरोधात सुनावणी होणार की नाही हे स्पष्ट होते. कनिष्ठ सभागृहात डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव मंजूर झाल्यानंतर आता तो पुढील प्रक्रियेसाठी अमेरिकी संसदेच्या अर्थात काँग्रेसच्या वरिष्ठ सभागृहात जाईल. एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे. अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विरोधकांचे अर्थात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. तर वरिष्ठ सभागृहात म्हणजेच सिनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे.
अभ्यासकांच्या मतानुसार, कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असल्यामुळे तिथे हा ठराव मंजूर होणे अपेक्षितच होते. आता हा ठराव पुढील महिन्यात अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडला जाईल. तिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे तिथे हा ठराव मंजूर न होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२० पर्यंत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पदावर कायम राहू शकतील.
विक्रोळीत शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार
अमेरिकेत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सार्वत्रिक निवडणूक होते आहे. तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प आपला कार्यकाळ पूर्ण करतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नक्की आरोप काय होते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दोन महत्त्वाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या आरोपात पुढील वर्षी अमेरिकेत होत असलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिडेन यांची बदनामी करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनवर दबाव टाकला असे म्हटले आहे.
दुसऱ्या आरोपात महाभियोग ठरावासंदर्भातील चौकशीमध्ये डोनाल्ड ट्रम्प सहकार्य करीत नसल्याचा आहे.