पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूः डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखला

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) देण्यात येणारा निधी रोखण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत. डब्ल्यूएचओने कोविड-१९ बाबत चुकीचे व्यवस्थापन केले आणि त्याची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मंगळवारी व्हाईट हाऊस येथे आयोजित नियमित पत्रकार परिषदेत त्यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर कोविड-१९ बाबतच्या डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे समीक्षण केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

अफवांवर विश्वास ठेवू नका, विशेष रेल्वे सोडणार नाही: रेल्वे मंत्रालय

अमेरिका डब्ल्यूएचओला दरवर्षी चार ते पाच हजार डॉलरची आर्थिक मदत देत असते, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. डब्ल्यूएचओने चीनमध्ये वास्तविक स्थितीचे आकलन करण्यासाठी तसेच तज्ज्ञ उपलब्ध करुन देण्यासाठी आणि पारदर्शकतेतील अभाव कमी करण्यासाठी काम केले होते का ? त्यांनी जर तसे केले असते तर याचा प्रकोप खूप कमी झाला असता आणि निश्चितरित्या मृत्यूही कमी झाले असते. हजारो लोकांचा मृत्यू आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान टाळता आले असते. 

वांद्रे गर्दी प्रकरण: उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक

निधी रोखण्याची ही योग्य वेळ नाही

अमेरिकेच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याची ही योग्य वेळ नाही. ही वेळ आता कोरोना विषाणूविरोधात लढण्याची आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट होण्याची ही वेळ आहे, असेही ते म्हणाले.