पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास डोनाल्ड ट्रम्प पुन्हा इच्छुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरप्रश्नी पुन्हा एकदा मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर या आठवड्याच्या अखेरीस हा मुद्दा उपस्थित करु असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने मोदी यांना काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी पाऊल उचलण्याची विनंती केली होती. 

काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

ट्रम्प यांनी माध्यमांना म्हटले की, काश्मीर ही अत्यंत जटील जागा आहे. तिथे हिंदू आणि मुसलमानही आहेत. त्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण आहे, हे मी म्हणणार नाही, असे म्हणत त्यांनी मध्यस्थीसाठी जे काही चांगले असेल, ते मी करेन, असे सांगितले. विशेष म्हणजे नुकताच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना जम्मू-काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचे म्हटले होते. परंतु, त्यांचा हा दावा स्वतः व्हाइट हाउसने फेटाळला होता. कलम ३७० च्या निर्णयामुळे काश्मीरप्रश्नी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीविरोधात भारत ठाम असल्याचे दिसून येते. त्यानंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. 

गुलाम नबी आझाद यांना पुन्हा रोखले; जम्मूवरुन दिल्लीला परत पाठवले

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांदरम्यान टेलिफोनवर सुमारे ३० मिनिटे चर्चा झाली होती. यावेळी मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता भारतातील शांतता प्रक्रियेत शेजारील देशातील काही नेते अडथळा आणत असल्याचे ट्रम्प यांना सांगितले होते. त्यांचा इशारा पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे होता. त्यांनी नुकतेच भारताविरोधात वक्तव्ये केली आहेत.

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; १ जवान शहीद