पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक आरोग्य संघटना पक्षपाती, डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात जागतिक आरोग्य संघटना पक्षपातीपणे काम करीत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची नमती भूमिका, भारताच्या भूमिकेला पाठिंबा

व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी पत्रकारांशी नैमित्तिक संवादावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला निधी देणार नाही. अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखला जाईल.

जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी अमेरिकेकडून दिला जातो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात आधी अमेरिकेचा विचार केलाच पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी अनेकवेळा म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचा नक्की किती निधी रोखणार याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी सांगितले की, मी नुसता बोलत नाही. तर करून दाखवतो. लवकरच मी निधी रोखणार आहे. 

कोरोनाच्या लढ्यात मोठा दिलासा; लॉकडाऊनमुळे संसर्ग झाला कमी

जागतिक आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.