पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममतादीदींनी माफी मागावी, संप मिटवण्यासाठी डॉक्टरांची प्रमुख अट

डॉक्टरांची निदर्शने

आपल्या सहकारी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा शुक्रवारी चौथा दिवस आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांना तातडीने कामावर परतण्याची सूचना केलेली असताना दुसरीकडे शुक्रवारी संपूर्ण देशभरात डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने याला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, नाराज डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बिनशर्थ माफीची मागणी केली आहे. संपावर असलेल्या डॉक्टरांनी कामावर परतण्यासाठी ६ अटी ठेवल्या आहेत. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या माफीचाही समावेश आहे.

कोलकात्यातील नीलरत्न सरकार वैद्यकीय रुग्णालयात सोमवारी रात्री एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर तेथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संपावर गेले आहेत. 

चला, आता जास्त पगार हातात येणार!; ESIC योगदानात कपात

दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग या दोन्ही रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवारी बंद ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही रुग्णालयातील ३५०० डॉक्टर्स आज दिवसभर काम बंद ठेवणार आहेत. कोलकात्यात घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ ही निदर्शने कऱण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील डॉक्टरांनीही पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी एक दिवसाच्या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. मुंबईत मार्डचे अध्यक्ष प्रशांत चौधरी म्हणाले, कोलकात्यामध्ये जे घडले ते जाणीवपूर्वक होते. यातूनच पुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. जे डॉक्टर या हल्ल्यात जखमी झाले आहेत, त्यांच्याबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. आम्ही आज दिवसभर कामावर जाणार नाही. पण त्याचवेळी रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी आम्ही ओपीडीतील, शस्त्रक्रिया विभागातील आणि दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार निश्चितपणे करू.

पंजाबमध्ये पतियाळा येथेही डॉक्टरांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. तिथेही आज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत काम बंद ठेवण्यात येणार आहे.