पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुग्ण तुमच्या प्रतिक्षेत, ममतांचे संपकरी डॉक्टरांना भावनिक आवाहन

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी संपावर गेलेल्या डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. हजारो रुग्ण उपचारासाठी तुमची प्रतिक्षा करत आहेत, अशा शब्दांत ममतांनी डॉक्टरांना कामावर परतण्याची विनंती केली. डॉक्टरांनी चर्चेचा प्रस्ताव नाकारला असला तरी त्यांच्यासाठी वार्ता करण्यासाठी राज्य सरकार कधीही तयार आहे, असेही ममता यावेळी म्हणाल्या.  

त्या पुढे म्हणाल्या की, "आम्ही त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास तयार आहोत. यासंदर्भात मंत्री आणि मुख्य सचिवांना त्यांच्यासोबत चर्चेसाठी पाठवले होते. पण कोणीही चर्चेला आले नाही. तुम्ही सांविधानिक संस्थांना सन्मान द्यायला हवा. आम्ही कोणालाही अटक केलेली नाही. कोणालाही चौकशीसाठी पोलिसांत जावे लागलेले नाही. आरोग्य सेवा अशा पद्धतीने खंडीत होणे चांगले नाही."

कोलकातामधील आंदोलनकर्त्या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरही संपात सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारअंतर्गत मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांसह दिल्लीतील जीबीटी सरकारी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, संजय गांधी मेमोरियल रुग्णालय आणि डीडीयू रुग्णालयातील डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

Doctors Strike : डॉक्टरांनी नाकारली ममतांची ऑफर