पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धन्य निर्णय! कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना दिले रेनकोट, सनग्लासेस

डॉक्टांना रेनकोट्स, सनग्लासेस आणि साधे कापडी मास्क देण्यात आले आहेत.

एकीकडे कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेविका आपल्या जीवाची बाजी लावून लढत असताना त्यांच्या सुरक्षिततेबाबत ढिसाळपणा दाखवला जात असल्याचे एक उदाहरण पश्चिम बंगालमध्ये समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील सिलिगुडीतील नॉर्थ बेंगाल मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स (पीपीई किट्स) देण्यात आलेली नाहीत. त्याऐवजी डॉक्टांना रेनकोट्स, सनग्लासेस आणि साधे कापडी मास्क देण्यात आले आहेत. याच ठिकाणी कार्यरत निवासी डॉक्टर शहरयार आलम यांनी प्रशासनावर हा आरोप केला आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

'कोरोनातून बरे झालेल्यांच्या प्लाज्मा इतरांना बरं करण्यासाठी उपयुक्त'

शहरयार आलम यांनी एएनआयला सांगितले की, आम्हाला पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स न दिल्याबद्दल आम्ही रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितले की पीपीई किट्स मागविण्यात आले आहेत. पण ते अद्याप आलेले नाहीत. आम्ही किट्ससाठी आग्रह धरल्यावर त्यांनी आम्हाला कामावर न येण्याची सूचना केली. आम्हाला केवळ रेनकोट, सनग्लासेस आणि साधे मास्क देण्यात आले आहेत. त्यांनी आम्हाला रेनकोट रोजच्या रोज धुण्यास सांगितले असून, तेच परत वापरण्याचा सल्लाही दिला आहे. 

पाकिस्तानमधील कोरोनाच्या रुग्णांसाठी चीनकडून हॉस्पिटलची उभारणी

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना प्रोटेक्टिव्ह सूट्स देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एन-९५ मास्कही वापरणे आवश्यक आहे. या सगळ्याला पीपीई किट्स म्हणतात. सिलिगुडीतील डॉक्टरांना हे किट्स न देता रेनकोट्स देण्यात आल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Doctors at North Bengal Medical College Siliguri claim that they ve been provided raincoats sunglasses