पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या भारतीयावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही संसर्ग

कोरोना विषाणू

भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या डॉक्टरवर सध्या त्यांच्याच घरी उपचार सुरु आहेत. त्यांना त्याच्या कुटुंबियांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. आज त्यांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. कलबुर्गीच्या उपायुक्तांनी ही माहिती दिली आहे. 

 

कोरोनामुळे मुंबईत एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू

कर्नाटकातील कलबुर्गी येथे ७६ वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या कर्नाटकामध्ये कोरोनाची लागण झाल्याची दोन नवीन प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये ६३ वर्षांच्या डॉक्टराचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना विषाणू वेगाने पसरत असल्याने कर्नाटक सरकारने मॉल, चित्रपटगृह, उद्याने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोरोनाबाधित रुग्णांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, फक्त..

चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना विषाणूने जगभरात आतापर्यंत ७ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ७३ हजार १७१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये एकट्या चीनमध्ये ३ हजार २१३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ८० हजार ८६० नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ११८ झाली आहे. तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना : ...म्हणून पुढील १५ ते २० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे