पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथ घेताच येडियुरप्पांकडून जुने आदेश स्थगित, २९ जुलैला विश्वासदर्शक ठराव

बीएस येडियुरप्पा

कर्नाटकचे नूतन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सर्व विभागप्रमुखांना नव्या प्रकल्पाशी निगडीत कुमारस्वामी सरकारने दिलेले आदेश स्थगित केले आहेत. शपथ घेताच त्यांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी योजनेशिवाय राज्य सरकारकडून दोन हजार रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा केली आहे.

कर्नाटकः येडियुरप्पांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

ज्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही अशा सर्व बदलीची प्रकरणे रोखण्यात आली आहेत. 

शपथ ग्रहण करताच येडियुरप्पांनी म्हटले की, राज्यातील ज्या लोकांनी मला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी त्यांचे आभार मानतो. मी २९ जुलै राजी सकाळी १० वाजता बहुमत सिद्ध करेल. त्यानंतर लगेच अर्थविधेयक संमत करुन घेईन. राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी योजनेशिवाय राज्य सरकारकडून २००० रुपयांचे दोन हप्ते दिले जातील.

कर्नाटकः 'गुडलक'साठी येडियुरप्पांनी नावाचं स्पेलिंग बदललं

दरम्यान, राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली.