पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींचा सहभाग असलेल्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चे आज प्रसारण, पंतप्रधानांनी केले खास ट्विट

नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स

डिस्कव्हरी वाहिनीवरून सोमवारी रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' कार्यक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. या कार्यक्रमाचा प्रसिद्ध सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स याच्यासोबत नरेंद्र मोदी दिसणार आहेत. अशा पद्धतीने भारताचे पंतप्रधान थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आलमट्टीतून विसर्ग आणखी वाढविला...

आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात, भारतातील हिरव्या गर्द जंगलांपेक्षा अजून काय सुंदर असू शकते. वातावरण बदल आणि पर्यावरण संवर्धन याविषयावर प्रकाशझोत टाकण्यासाठी आज रात्री नऊ वाजता प्रसारित होणारा कार्यक्रम नक्की बघा. 

याच कार्यक्रमाबद्दल बेअर ग्रिल्स यानेही ट्विट केले असून, त्याने म्हटले आहे की, आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा माझा प्रवास नक्की बघा. आपण सगळे मिळून पृथ्वीच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी, शांततेसाठी जे काही करता येईल, ते नक्की करूया. कार्यक्रमाचा नक्की आनंद घ्या.

पाकिस्तानची कटूता: भारतीय जवानांकडून मिठाई घेण्यास नकार

जगप्रसिद्ध असलेल्या या कार्यक्रमाचा आठवा सिझन सध्या सुरू आहे. या कार्यक्रमात बेअर ग्रिल्स निर्मनुष्य भागांतून प्रवास करतो. त्यावेळी येणाऱ्या आव्हानांचा तो मुकाबला करतो. यातील त्याच्या अनुभवांची मांडणी या कार्यक्रमात करण्यात आली आहे. या कार्यक्रमात याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अभिनेत्री केट विन्सेट, जुलिया रॉबर्ट्स, टेनिसपटू रॉजर फेडरर हे सहभागी झाले आहेत.