पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचे साईड इफेक्ट्स, चीनमध्ये घटस्फोटांच्या संख्येत वाढ

चीनमध्ये कोरोनानंतर आता घटस्फोटांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव आता चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरी हा देश सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरा जातो आहे. वेगवेगळ्या माध्यमांनी या समस्येबद्दल वृत्त प्रसारित केले आहे. चीनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घटस्फोटामध्ये कमालीची वाढ झाली आहे. अचानकपणे घटस्फोट मागणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. चीनमधील विवाह नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. 

कोरोनामुळे मुंबईत एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू

चीनमध्ये गेल्या दोन महिन्यात कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे वुहानमध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना घरातच डांबून ठेवण्यात आले होते. या संपूर्ण भागात एक प्रकारे संचारबंदीच लागू करण्यात आली होती. पण त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. अनेक जोडप्यांनी या काळात एकमेकांसोबत जास्त काळ घालविल्याने त्यांना आता घटस्फोट हवा आहे.

नौदलामध्येही महिलांना कायमस्वरुपी नेमणूक, सुप्रीम कोर्टाचे आदेश

चीनमधील दाझूमधील विवाह नोंदणी कार्यालयातील व्यवस्थापक लू शिजून म्हणाले, घटस्फोटांच्या प्रमाणात तुलनेत खूप वाढ झाली आहे. अनेक भागात संचारबंदीची स्थिती असल्यामुळे तरूण जोडपी घरातच जास्त दिवस थांबली होती. यावेळी त्यांच्यामध्ये जोरदार वादविवाद आणि भांडणे झाल्याचे दिसते. त्यातूनच त्यांनी आता घटस्फोटाची मागणी केली आहे. २४ फेब्रुवारीनंतर सुमारे ३०० जोडप्यांनी त्यांच्या कार्यालयाकडे घटस्फोटासाठी अर्ज केले आहेत.