पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीर: हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याचा खात्मा

लष्कराचे जवान

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश आले आहे. डोडा येथे झालेल्या चकमकीत जवानांनी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या जिल्हा कमांडरला ठार केले आहे. हारुण हफाज असं या दहशतवाद्याचे नाव आहे. हारुण हफाज याने आरएसएस नेता चंद्रकांत शर्मा यांची हत्या केली होती. भारतीय लष्कर गेल्या काही महिन्यांपासून हारुणचा शोध घेत होते. अखेर त्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावर जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

कलम ३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल - लष्करप्रमुख
 
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. हारुण आपल्या काही साथिदारांसोबत डोडाच्या गुंदला येथील जंगलात लपून बसला असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत जंगलाला घेराव घातला. जवानांनी आधी हारुणला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्याने जवानांवर गोळबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत हारुणचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर हारुणचा आणखी एक साथिदार जंगलात लपून बसला आहे. जवानांकडून त्याचा शोध सुरु आहे. 

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड पोलिस गेल्या अनेक महिन्यांपासून हारुणचा शोध घेत होते. डोडा पोलिसांनी हारुण आणि त्याच्या साथिदारांवर १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. हारुण वाणी डोडा येथील राहणारा होता. एमबीए झालेला हारुण डोडामध्ये नोकरी करत होता. मात्र २०१७ मध्ये अचानक तो बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यचा खूप प्रयत्न केला. मात्र २०१८ मध्ये हिजबुल या दहशतवादी संघटनेच्या एका ग्रुपफोटोमध्ये तो दिसला होता. 

ऍमेझॉनकडून देशातील छोट्या उद्योगांसाठी मोठी घोषणा