पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुहेरी नागरिकत्वः राहुल गांधींविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

राहुल गांधी (PTI FILE)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभा निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करणारा अर्ज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. राहुल गांधी यांनी एका कंपनीत स्वतःला ब्रिटनचा नागरिक असल्याचे घोषित केल्याचा आरोप करण्यात आला होता. राहुल यांच्या विरोधात दाखल केलेल्या अर्जात कोणतेही 'मेरिट' दिसत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना नोंदवले आहे. भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थितीत केला होता.

काय मूर्खपणाय?, राहुल भारतीयच; प्रियांका गांधींचे प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वावर प्रश्न उपस्थितीत करताना भगवाम गोयल आणि चंद्रप्रकाश त्यागी यांनी अर्ज दाखल केला होता. राहुल गांधी यांनी स्वतःला ब्रिटनचा नागरिक घोषित केले आहे. त्यामुळे त्यांना भारतीय नागरिक होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढणे आणि एका नोंदणीकृत पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्यापासून त्यांना रोखले जावे, अशी मागणी गोयल आणि त्यागी यांनी केला होता. या अर्जावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्वरीत सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सरन्यायाधीशांनी कोणतेच आदेश दिले नाही.

'मोदींनी आदिवासींच्या जमिनी अनिल अंबानींच्या घशात घातल्या'

'आम्ही ही याचिका फेटाळत आहोत. कारण त्यात तथ्य नाही,' असे सरन्यायाधीश गोगोई यांनी सुनावणी दरम्यान म्हटले. 'एखाद्या कंपनीने अर्जात राहुल गांधी यांचा ब्रिटीश नागरिक म्हणून उल्लेख केला तर त्यामुळे ते ब्रिटीश नागरिक झाले का?, ' अशी टिप्पणी गोगोई यांनी केली.

दरम्यान, गेल्या महिन्याच्या अखेरीस गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नागरिकत्वाबाबत नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्रालयाने ही नोटीस पाठवली होती.