पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांना बीरभूम जिल्ह्यातील देओचा पचमी कोळसा खाणीचे उद्घाटन करण्याची विनंती केल्याचे ममता बॅनर्जींनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या खाणीमुळे राज्यात एक लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. कोळसा खाणीमुळे १२ हजार कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.
ममता बॅनर्जींनी राज्याचे नाव बदलण्याचा मुद्दाही पंतप्रधान मोदींसमोर उपस्थित केला. या प्रकरणी पंतप्रधानांनी काही आश्वासने दिली असल्याचे त्या म्हणाल्या. जर त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या नावातील बदलाबाबत आणखी काही सुचना असतील तर त्याचे आम्ही स्वागत करु. आम्हाला राज्याचे नाव बांगला करायचे आहे. याबाबत मी पंतप्रधानांना सूचना करण्याची विनंती केली आहे, असेही त्या म्हणाल्या.
West Bengal CM @MamataOfficial calls on PM @narendramodi in New Delhi. pic.twitter.com/qxFPXTmezO
— PMO India (@PMOIndia) September 18, 2019
राज्य सरकारने वर्ष २०११ मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून पश्चिम बंगा करण्यास सांगितले होते. पण केंद्राने यास नकार दिला होता. त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये राज्याने इंग्रजीत बंगाल, बंगालीत बांगला आणि हिंदीत बंगाल करण्यास सांगितले होते. तेही केंद्राने अमान्य केले होते.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रम लवकरच संपूर्ण देशात - अमित शहा
पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदी यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या या बैठकीचे छायाचित्र टि्वट केले. ममता बॅनर्जींनी मोदींना फुलांच गुच्छ भेट देतानाचे हे छायाचित्र आहे. पंतप्रधानांची भेट हा शिष्टाचार असल्याचे ममतांनी मंगळवारी म्हटले होते.