पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करणार

एअर इंडिया

जीवघेणा कोरोना विषाणू चीनमध्ये झपाट्याने पसरत आहे. या विषाणूने आतापर्यंत १०६ नागरिकांचा बळी घेतला आहे. चीनच्या वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार विमान पाठविण्याचा विचार करीत असल्याचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले. परराष्ट्रमंत्र्यांच्या या विधानानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमान उड्डाणाला मंजुरी दिली.

 

'PM मोदींशी चर्चा करायला तयार, पण CAAला आधी मागे घ्या'

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. एस जयशंकर दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील वडोदरा विमानतळावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. तसंच, भारतीय दूतावास चीन सरकारशी सतत संपर्कात आहे. वुहानमधून विद्यार्थी आणि भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आम्ही तेथे विमान पाठविण्याचा विचार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

'९ फेब्रुवारीचा मोर्चा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ नाही'

तसंच, एस. जयशंकर यांनी पुढे असे सांगितले की, विद्यार्थ्यांना आणि भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत लोकांनी सरकारवर विश्वास ठेवावा अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, चीनमध्ये असलेल्या  भारतीय विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांनी काळजी करण्याची गरज नाही असे जयशंकर यांनी सांगितले. 

नाशिक : रिक्षाला धडक देऊन एसटी बस विहिरीत, ७ ठार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:directorate general of civil aviation has approved air india flight to wuhan for the evacuation of indian citizens