पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय दूतावासांसोबतच्या गैरवर्तनाबद्दल भारताचे पाकला पत्र

पाकिस्तानमध्ये भारतीय राजदूतांसोबत गैरवर्तन

इस्लामाबाद येथील भारतीय उचायुक्तांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. मागील महिन्यात पाकिस्तानमध्ये भारतीय दूतावासांना एका खोलीत डांबून ठेवण्याचा प्रकार घडला होता. पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेतील 15 जणांनी भारतीय दूतावासांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला. तसेच त्यांना अर्धा तास एका खोलीमध्ये बंद करुन ठेवले होते. 

पाकिस्तानमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पाकिस्तानला पत्र पाठवल्याची माहिती याप्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली. त्यांनी भारतीय दूतावासांसोबत घडलेल्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली नसली तरी याकडे गांभिर्याने पाहिले जात असल्याचे संकेत दिले आहेत. 

17 एप्रिलला लाहोर जवळील सच्चा सौदा गुरुद्वारामध्ये भारतीय भारतीय दूतावासांसोबत हा प्रकार घडला होता. धार्मिकस्थळी आलेल्या यात्रेकरुंच्या सेवा-सुविधेसाठी ही मंडळी धार्मिक स्थळावर पोहचली. मात्र त्याठिकाणी पाकिस्तानमधील गुप्तहेर संघटनेच्या 15 जणांनी भारतीय भारतीय दूतावासांना गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. याशिवाय त्यांना काहीकाळ एका खोलीमध्ये बंद करुन ठेवले होते.