पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानचा काश्मीर राग कुचकामी ठरवण्यासाठी भारत सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

जी-७ बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता आहे. कूटनीतीक स्तरावर पाकिस्तानचा काश्मीर राग कुचकामी ठरवण्याची पूर्ण तयारी भारताने केली आहे. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा दि. २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हा दौरा मोठा आहे. ह्यूस्टननंतर त्यांचे पाच दिवसांचे कार्यक्रम न्यूयॉर्क व इतर ठिकाणी होणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये २७ सप्टेंबरला ते संयुक्त राष्ट्र महासभेत बोलतील. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान बोलणार आहेत.

वार्निश कोटिंगच्या १०० रुपयांच्या नोटा लवकरच येणार चलनात

कूटनीतीक तज्ज्ञांच्या मते, भारत-पाकदरम्यान काश्मीर प्रकरणावर संयुक्त राष्ट्र संघात शाब्दिक युद्ध पाहायला मिळणार हे निश्चित आहे. काश्मीर हे अंतर्गत प्रकरण असल्याचे सांगत भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला जगासमोर आणेल. तर पाकिस्तानही मानवाधिकाराच्या नावावर जगाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणानंतर मोदी ट्रम्प यांची भेट घेतील. पण याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून काही सांगण्यात आलेले नाही. परंतु, मोदींच्या दीर्घ दौऱ्यावरुन मोदी हे वॉशिंग्टन येथे ट्रम्प यांची भेट घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तरुणी सापडली

तज्ज्ञांच्या मते, संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान कितीही काश्मीरच्या नावावर भारतविरोधी राग आळवत असला तरी त्यांची रणनीती यशस्वी होणार नाही. कारण भारताने पाकच्या कुप्रचाराला उत्तर देण्याची रणनीती तयार केली आहे. इमरान खान यांच्या हताश भाषणांमुळे भारताने कूटनितीत आघाडी घेतल्याचे दिसते. पाकिस्तान ज्या पद्धतीने जगाचा पाठिंबा न मिळाल्यामुळे अश्रू ढाळत आहे. त्यावरुन त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बुरखा फाटल्याचे स्पष्ट होत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Diplomacy Narendra Modi Donald Trump Meeting India Ready To Destroy Pakistan Kashmir Agenda In United Nations