पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'प्रज्ञासिंह यांच्या प्रचारानंतर शिवराजसिंह यांना आंघोळ करावी लागत नाही ना?'

दिग्विजय सिंह आणि शिवराज सिंह चौहान

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. भोपाळमधून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली होती. 'दिग्विजय सिंह यांचे नाव माझ्या तोंडातून निघाले नाही पाहिजे, नाहीतर मला आंघोळ करावी लागेल', असे वक्तव्य शिवराजसिंह चौहान यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार दिग्विजय सिंह यांनी घेतला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (भोपाळ भाजप उमेदवार) यांचा प्रचार केल्यानंतर शिवराजसिंह यांना आंघोळ तर करावी लागत नाही ना, असा तिरकस सवाल त्यांनी विचारला आहे. 

मी कन्हैय्याकुमारचा समर्थक, आरजेडीने मोठी चूक केली-दिग्विजय सिंह

शिवराजसिंह यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचारसभेत रोड शो दरम्यान बोलताना म्हटले होते की, 'भगव्याला कधीही दहशतवादाशी जोडले जाऊ शकत नाही. पण दहशतवादाशी जोडण्याचे काम दिग्विजय सिंह यांनी केले आहे. मी त्यांचे नाव घेतले आहे. आता मला आंघोळ करावी लागेल.'

प्रज्ञा ठाकूर यांच्याबद्दल स्वरा भास्करनं व्यक्त केलं ठाम मत

यापूर्वीही शिवराज यांनी राजगड येथील सभेत म्हटले होते की, येथील एक असा व्यक्ती आहे, जो १० वर्षे मुख्यमंत्री होता. मी त्यांचे नाव घेणार नाही.. नाहीतर मला आंघोळ करावी लागेल, ते शहिदांचा अपमान करतात आणि मोदींच्या विरोधात भारताचा अपमान करतात. तुम्ही अशा लोकांना सहन कराल का, असा प्रश्न विचारला. त्यांचा स्पष्ट इशारा हा दिग्विजय सिंह यांच्याकदडे होता. ते १९९३ ते २००३ दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:digvijaya singh slams on shivraj singh chauhan says pragya singh thakur ka prachar karne baad toh unko nahana nahi padta