देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन योग्य केलं, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. बहुमताचा आकडा नसताना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला नको होती, असा टोलाही त्यांनीही एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना लगावला आहे.
महाराष्ट्रातून भाजपचा अंत होण्यास सुरुवात: मलिक
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी योग्यच केलं. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नव्हता. बहुमताचा आकडा सिद्ध केल्याशिवाय शपथ घेणं योग्य नव्हतं असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: Devendra Fadnavis did the right thing by resigning (as Maharashtra CM), he did not have the majority. He should not have taken the oath in the first place before proving his majority. pic.twitter.com/45u9oKYGvM
— ANI (@ANI) November 26, 2019
अजित पवार यांनी काही कारणास्तव आमच्यासोबत येण्यास नकार दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजभवनात जाऊन राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव आमच्यासोबत येण्यास नकार दिल्याने आम्ही बहुमत सिद्ध करु शकत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.