पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्राचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्रीः भाजप खासदार

देवेंद्र फडणवीस पदभार स्वीकारताना

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे. केंद्राचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ८० तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास ते या विकास निधीचा गैरवापर करतील म्हणून हे सर्व नाट्य घडवल्याचे त्यांनी म्हटले आहे. हेगडे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

हेगडे पुढे म्हणाले की, हे ठरवून केलेले नाटक होते. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी १५ तासांच्या आत ४० हजार कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून केंद्राकडे परत पाठवले. 

हेगडे हे उत्तर कर्नाटक येथे भाजप कार्यकर्त्यांबरोबर बोलत होते. ते म्हणाले, तुम्हाला माहीत आहे, फडणवीस हे ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक का केले ?  आमच्याकडे बहुमत नाही हे माहीत होते, तरीही ते मुख्यमंत्री झाले. हाच प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.

आता विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा राहावी हीच इच्छा, शिवसेनेचा टोला

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणे हे पूर्वनियोजित होते. त्यांना महाविकास आघाडीचे सरकार या निधीचा गैरवापर करतील अशी भीती होती, असे हेगडे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

दरम्यान, फडणवीस हे त्या काळात काळजीवाहक मुख्यमंत्री होते. या काळात मुख्यमंत्र्यांना असे अधिकार असतात का हा प्रश्न आहे. विकास निधी हा वेगवेगळ्या प्रकल्यापासाठी मिळत असतात. ते वेगवेगळ्या मार्गाने फडणवीस यांनी परत पाठवल्याचे हेगडे यांनी म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर 'जैश'च्या दहशतवाद्यांचा दिल्लीवर होता निशाणा

आता राज्य सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:devendra Fadnavis became CM and in 15hrs he moved Rs 40000 Cr back to Centre says bjp leader ananth hegde