पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या तीन कारणांमुळे दिल्लीत विजयाचा भाजप नेत्यांना विश्वास

अमित शहा आणि मनोज तिवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. सर्व एक्झिट पोल्सनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार येईल, यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण तरीही दिल्लीमध्ये यावेळी भाजपचेच सरकार येईल, असे भाजपचे सर्वच नेते आत्मविश्वासाने सांगताहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर दिल्लीत ७० पैकी भाजपच्या ४५ जागा येतील, असे म्हटले आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी पक्ष ४८ जागा जिंकेल, असा अंदाज वर्तविला आहे.

कोणत्या आधारावर भाजपचे नेते इतक्या मोठ्या आत्मविश्वासाने राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा करताहेत, असा प्रश्न आता विचारला जातोय. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाव्यामागे एकूण तीन कारणे आहेत.

'आरोपीला कठोर शिक्षा देऊ, नागरिकांनी संयम बाळगावा'

१. दिल्लीमध्ये शेवटच्या दोन तासांत तब्बल १७ टक्के मतदान झाले आहे. हे मतदान कोणत्याही एक्झिट पोल्समध्ये गृहीत धरलेले नाही. दुपारपर्यंत जे मतदान झाले त्याच आधारावर एक्झिट पोल्सचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. शेवटच्या दोन तासांतील मतदानाचा त्यात समावेश नाही. हा मुद्दा भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा वाटतो.

२. भाजपने निवडणुकीआधी जे अंतर्गत सर्वेक्षण केले. त्यानुसार दिल्लीमध्ये पक्ष ३८ जागांवर विजय मिळवेल, असा अंदाज आहे. याच सर्वेक्षणानुसार आम आदमी पक्षाला केवळ ३२ जागाच मिळण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक रस्ता बेमुदत काळासाठी अडवू शकत नाही - सुप्रीम कोर्ट

३. दिल्लीमध्ये २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत केवळ पाच टक्के कमी तर गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के जास्त मतदान झाले आहे. यावरूनही एक्झिट पोल्सचे अंदाज चुकू शकतात, असे भाजपच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यावर लगेचच आम आदमी पक्षाकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठविण्यात आला. यावरूनही दिल्लीत भाजपचेच सरकार येईल, असा अंदाज नेते वर्तवित आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:despite the predictions of defeat in all exit polls why is the bjp claiming to form the government in delhi