पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जॅग्वारऐवजी BMW भेट दिली म्हणून तरुणाने ती चक्क नदीत फेकली!

बीएमडब्लू गाडी नदीत फेकली

पालकांकडे जॅग्वार गाडीची मागणी केली असताना त्यांनी बीएमडब्लू गाडी भेट दिली म्हणून हरियाणातील एका तरुणाने चक्क नवी गाडी दुथडी भरून वाहात असलेल्या नदीत ढकलून दिली. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. विशेष म्हणजे गाडी नदीत ढकलत असतानाचा एक व्हिडिओ त्याने तयार करून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापूरमधील पूर कायम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील यमुनानगरमध्ये हा प्रकार घडला. आई-वडिलांकडे जॅग्वार गाडीची मागणी तरुणाने केली होती. पण त्यांनी बीएमडब्लू भेट दिल्याने हा तरुण चिडला होता. आई-वडिलांना धडा शिकवण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याची माहिती मिळते आहे. 

तरुणाने आपली नवी कोरी बीएमडब्लू गाडी नदीमध्ये ढकलली. पण ती नदीत गेल्यावर एके ठिकाणी अडकून पडली. नंतर याच तरुणाने स्थानिकांच्या मदतीने गाडी नदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.