पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, राहुल गांधींचा घणाघाती आरोप

राहुल गांधी

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत सरकारवर केला. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शनिवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सोमवारी संसदेत जोरदार निदर्शने करण्यात आली. लोकसभेमध्ये काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यावेळीच राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हटले आहे.

'हा सत्ता स्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणारे पत्र'

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी राहुल गांधी सोमवारी प्रश्न विचारणार होते. पण सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस सदस्यांनी महाराष्ट्रातील घडामोडींवरून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळीच अशा गोंधळाच्या वातावरणात मी प्रश्न विचारू शकत नाही. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सभागृहातील गोंधळ कमी होत नसल्याचे पाहून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केले होते.

... या मागे माझा हात असल्याचे म्हणणे चुकीचे - शरद पवार

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने सोमवारी कामकाज तहकुबीची सूचना दिली होती. राज्यसभेतही या मुद्द्यावरून सोमवारी विरोधकांनी गोंधळ घातला. सभागृहाचे कामकाज तहकूब करून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रात्रीत मागे घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा करा, अशी विरोधकांची मागणी होती.