पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उपोषणाला बसलेल्या स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

स्वाती मालीवाल

बलात्कारातील दोषींना त्वरीत फाशी देण्याची मागणी करत मागील १२ दिवसांपासून उपोषण करत असलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारीच त्यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना इशाराही दिला होता. उपोषणामुळे त्यांचे वजन ८ किलोंनी कमी झाले आहे. अशक्तपणामुळे त्यांना चालताही येत नसल्याचे सांगण्यात येते. बलात्कार प्रकरणातील दोषींना ६ महिन्यांच्या आत फाशी द्या, अशी स्वाती मालीवाल यांची मागणी आहे.

स्वाती मालीवाल यांना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

'पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राइक'

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या, त्यानंतर उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित युवतीला जाळून मारण्याच्या घटनेपासून मालीवाल या उपोषणाला बसल्या आहेत. गेल्यावर्षीही त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपोषणाला बसल्या होत्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi women commission chief Swati Maliwal sitting on hunger health deteriorates admitted to LNJP hospital