पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Delhi violence : मृतांचा आकडा ३३ वर

दिल्ली हिंसाचार

ईशान्य दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारात बळी गेलेल्यांचा आकडा हा  ३३ वर गेला आहे. रविवारपासून उसळलेल्या हिंसाचारातील सर्वाधिक जखमींना उपचारांसाठी जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर काही जखमी लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

वायुसेनेच्या विमानातून चीनमधल्या ७६ भारतीयांना आणले माघारी

सोमवारी रात्री उशीरा ८० हून अधिक जखमी उपचारांसाठी जीटीबी रुग्णालयात  आले होते. यातले सर्वाधिक हे गोळी लागून जखमी झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं.  आतापर्यंत या हिंसाचारात २०० जण जखमी झाल्याचं समजत आहे. जखमींमध्ये ५० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेशही आहे. 

 १०६ जणांना अटक 
दिल्लीत भडकलेल्या हिंसाचाराच्या प्रकणात १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. दिल्ली गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मंदीप सिंह रंधावा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

कोरोना : जपानच्या जहाजात अडकलेले ११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी परतले

गुप्तचर अधिकाऱ्याचा मृत्यू 
चांदबाग येथे झालेल्या दगडफेकीत आयबीच्या एका २६ वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. चांदबाग येथील नाल्यात अंकित शर्मा नावाच्या व्यक्तीचा एक मृतदेह मिळाला आहे. हत्येनंतर त्यांचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयान दिल्ली पोलिसांना धरले धारेवर 
दिल्लीत भडकलेल्या दंगलींसाठी कारणीभूत ठरणारी प्रक्षोभक विधाने करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार प्रवेश वर्मा आणि माजी आमदार कपिल मिश्रा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेऊन त्याची माहिती आज, गुरुवारपर्यंत देण्यात यावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीच्या पोलिसांना दिले आहेत . तसेच भडकलेल्या हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयानंही दिल्ली पोलिसांनी व्यावसायिकतेचा अभाव दाखवल्याबद्दल धारेवर धरलं आहे. 

मराठी भाषा दिन विशेष : भाषेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी