पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली : वेगवेगळ्या परिसरात आणखी तीन मृतदेह सापडल्याने खळबळ

दिल्लीत आणखी तीन मृतदेह सापडले आहेत

दिल्लीतील हिंसाचारानंतर रविवारी वेगवेगळ्या भागात दिल्ली पोलिसांना तीन मृतदेह आढळून आले आहेत. गोकुळ परिसरातील नाल्यात एक तर भागीरथी विहार येथील नाल्यात दोन मृतदेह पोलिसांना सापडले असून याचा दिल्ली हिंसाचाराशी संबंध आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. दिल्लीतील हिंसाचारामध्ये आतापर्यंत ४२ जणांनी आपला जीव गमावला आहे. जर या मृतदेहांचा हिंसाचाराशी संबंध आढला तर बळींचा आकडा आता ४५ वर पोहचेले. 

ममता दीदींनी राज्यात दंगल घडवून आणली : अमित शहा

दिल्ली हिंसाचारानंतर गुप्तरर विभागाचे अधिकारी अंकित वर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील एका नाल्यातच सापडला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनकर्ते आणि या कायद्याचे समर्थन करणाऱ्या आंदोलकांमध्ये जाफराबाद परिसरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर दिल्लीमध्ये हिंसाचार उफाळून आल्याचे पाहायला मिळाले होते. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या भडक्यात ८७ लोकांना गोळ्या लागल्या असून ३०० हून अधिक जण दगड आणि वीटांच्या माऱ्यामुळे जखमी झाले आहेत. 

'मुंबईत शिवसेना नंबर एक तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवी'

दिल्ली पोलिसांनी यापूर्वी मृत आणि रुग्णालयातील उपचार सुरु असलेल्या आकडा जाहीर केला होता. त्यानंतर आता नाल्यात सापडलेल्या मृतदेहामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.  शनिवारी दिल्ली पोलिसांनी ११ मृतदेह शवविच्छदनसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले होते. त्यातील ६ मृतहेहाचे शवविच्छेदन अद्याप बाकी असून यातील  ३ मृतदेहांची ओळख पटली नव्हती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Violence Three more bodies pulled out one from a canal in Gokalpuri and two from Bhagirathi Vihar canal