पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार: अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या अटकेच्या मागणीचा ट्रेंड

स्वरा भास्कर

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) मुद्यावरुन परखड मते मांडणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करला सध्या ट्विटरवर ट्रोल करण्यात येत आहे. दिल्लीतील हिंसाचाराला स्वरा भास्कर जबाबदार असल्याच्या प्रतिक्रियाही उमटत असून #ArrestSwaraBhasker हा हॅश टॅग ट्रेंडमध्ये आहे. स्वरा भास्कर देखील नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत आपल्या मुद्यावर ठाम आहे.  

'चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याची ही वेळ नाही'

#ArrestSwaraBhasker या हॅशटॅगच्या माध्यमातून स्‍वरा भास्करच्या काही वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत. स्वराच्या भडकाऊ प्रतिक्रियामुळे दिल्लीत हिंसाचार उफाळला, असाही युक्तीवाद सोशल मीडियावर सुरु आहे. एका नेटकऱ्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘स्वरा भास्कर उघडपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास ठेवू नका, असा संदेश ट्विटरच्या माध्यमातून देत आहे. हे चुकीचे आहे. दिल्लीतील आंदोलन भडकवण्याला स्वराच जबाबदार असल्याचा दावा आणखी एका नेटकऱ्याने केला आहे. स्वरा भास्कर आपल्या ट्विटच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांना भडकवण्याचे काम करत आहे. रस्त्यावर उतरुन तोडफोड करण्याला प्रोत्साहित करत आहे. तिला अटक करायला हवे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.  

केंद्र आणि दिल्ली सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली - काँग्रेस
 
सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना स्वरा भास्करने चांगलेच सुनावले आहे.  माझी चिंता करुन का? दिल्लीत जे काही घडले ते तुमच्यासारख्या विचारणीमुळेच झाले आहे. एक दिवस ही आग तुमच्या घरापर्यंत पोहचले आणि त्याला तुम्हीच जबाबदार असाल, अशा शब्दांत स्वराने टोलर्संना फटकारले आहे. 

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले होते. या हिंसाचारामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला. दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्यावरुन बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रिया उमटत असल्याचेही पाहायला मिळत आहे. अनुराग कश्यप, जावेद अख्तर यांच्यासह सोनम कपूर, कृतिका कामरा, रविना टंडन या कलाकारांनी दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: delhi violence swara bhaskar trolled brutally for making a comment and questioning on supreme court of india trolls demand for arrest swara bhaskar