पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली : हिंसा करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलन पेटल्याचे पाहायला मिळाले होते.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिस कर्मचाऱ्यासह १३ जणांचा बळी गेला आहे. १३० हून अधिक जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंसाचार करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घाला, असे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.  

दिल्ली हिंसाचार: आतापर्यंत १३ जणांनी गमावला जीव

दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक पार पडली. यावेळी लष्कराला पाचरण करण्यासंदर्भातील मागणी करण्यात आली. मात्र दिल्ली सरकारची ही मागणी गृह मंत्रालयाने फेटाळून लावली आहे. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलिस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, असा दावा केंद्राकडून करण्यात आला आहे.  

धगधगत्या दिल्लीची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे

दिल्लीतील हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह १३ जण ठार झालेत. हिंसाचारात ५६ पोलिस आणि १३० नागरिक जखमी झालेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलंय. सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.