पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहरुखने दिल्ली पोलिसांना सांगितले गोळीबार करण्यामागचे कारण

शाहरुख

दिल्ली हिंसाचारा दरम्यान गोळीबार करणाऱ्या शाहरुखला पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिस शाहरुखची कसून चौकशी करत आहे. 'रागाच्याभरात गोळीबार केल्याचे शाहरुखने चौकशी दरम्यान सांगितले. तसंच गोळीबारासाठी शाहरुखने वापरलेली बंदूक जप्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे.', अशी माहिती दिल्लीच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त अजित कुमार सिंगला यांनी दिली. शाहरुखच्या अटकेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

दिल्ली हिंसाःकॉन्स्टेबलवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला अटक

सिंगला यांनी पुढे असे सांगितले की, 'शाहरुखविरोधात कोणतीही गुन्हेगारी नोंद नाही. मात्र, त्याच्या वडिलांविरूद्ध बनावट चलन आणि मादक पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची कसून तपास सुरु आहे. दरम्यान, शाहरुखला उत्तर प्रदेशच्या शामली पोलिसांनी अटक केली. दिल्ली हिंसाचारावर शाहरुखने पोलिसांवर फक्त पोलिसांवर बंदूक रोखली नव्हती तर ८ वेळा गोळ्यांच्या फैरी झाडल्या होत्या.  

दुसरीकडे, गुप्तचर अधिकारी अंकित शर्माच्या हत्येचा आरोपी आपचा नगरसेवक ताहिर हुसेन अजूनही फरार आहे. दिल्ली पोलिसांनी दिल्लीपासून ते ताहिर हुसेनचे गाव अमरोहापर्यंत छापा टाकला. मात्र ताहिर हुसेन अद्याप सापडला नाही. पोलिसांनी ताहिर हुसेनच्या नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची यादी तयार केली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे.  

स्पर्श केल्यावर पुरुषाचा हेतू महिलेला कळलेला असतो - मुंबई हायकोर्ट