पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाळपोळीत देशाचं भविष्य उद्धवस्त झाले : राहुल गांधी

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. दिल्लीतील घटना ही देशाच्या प्रतिष्ठा मलीन करणारी आहे, असे या भेटीनंतर राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी बुधवारी सर्वोत अगोदर बृजपुरी परिसरातील अरुण पब्लिक स्कूलला भेट दिली. हिंसाराच्या वेळी झालेल्या जाळपोळीनंतर शाळेतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. 

कॅगच्या अहवालात उल्लेखित प्रकल्प २०१४ पूर्वीचे : फडणवीस

यावर राहुल गांधी म्हणाले की, ही फक्त एक शाळा नाही. ही इमारत म्हणजे देशाच भविष्य होती. द्वेषाच्या भावनेतून शाळेची नव्हे तर देशाच्या भविष्य जाळण्यात आले, अशा शब्दांत त्यांनी दंगलखोरांवर संताप व्यक्त केला. द्वेष आणि हिंसा पसरवणारे विकासाचे शत्रू आहे. दिल्लीतील हिंसाचारासारख्या घटनेतून लोकांना विभागण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

निर्भया प्रकरण : आता दोषींच्या फाशीची

या परिसरातील जनतेवर आज दुख कोसळले आहे. त्यांच्या दुख:त सहभागी होण्यासाठी याठिकाणी आलो आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. हिंचारानंतर निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करावे लागले, असेही आवाहनही राहुल गांधींनी यावेळी केले.  बंधुभाव, एकता आणि शांती हिच आपली ताकद आहे. दिल्ली हिंसाचारात देशाच्या बंधुत्वाला आणि एकतेला जाळण्यात आले. तिरस्काराच्या भावनेतून देशात फूट पाडण्याचा जो प्रयत्न सुरु असून हा प्रकार देशासाठी धोकादायक आहे, अशी भावनाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली. यावेळी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थितीत होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi violence: Rahul Gandhi along with other Congress leaders arrives in Brijpuri in Northeast Delhi which had witnessed violence